यजमान मुंबा घरच्या मैदानावर पराभूत
गतविजेत्या पाटण्याला नमवून जयपूर उपांत्य फेरीत
मुंबई, दि. 23 - प्रो कबड्डी लीगमध्ये घरच्या मैदानावर यू मुंबा पहिल्यांच पराभूत झाले आहेत. मुंबाला आता उरलेले दोन्ही सामने जिंकने अनिवार्य झाले आहे. अन्याथा स्पर्धेत उपात्यं फेरी सुद्धा मुंबा गाठू शकणार नाही. जयपूर पिंक पँथर्सने गतविजेत्या पाटणा पायरेट्सचा 29-22 अशा फरकाने पराभव करून प्रो कबड्डी लीगची उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. अजय कुमार जयपूरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र पंचांचे वादग्रस्त निर्णय आणि कबड्डीरसिकांनी त्यांची उडवलेली हुर्यो यामुळे या लढतीला गालबोट लागले. दुसर्या लढतीत बंगाल वॉरियर्सने यजमान यू मुंबाला 31-26 असा पराभवाचा धक्का दिला.यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात बंगालने पहिल्या सत्रात 11-9 अशी माफक आघाडी घेतली. मात्र दुसर्या सत्रात बंगालने यू मुंबावर लोण चढवून आपली आघाडी वाढवली. या धक्क्यातून यू मुंबाने सावरून एक मिनिट शिल्लक असताना लोणची परतफेड केली; परंतु त्यांचे अखेरच्या मिनिटांतील प्रयत्न विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ’ जँग कुन ली आणि मोनू गोयत यांच्या चढायांनी बंगालच्या विजयाचा अध्याय लिहिला, तर गिरीश इर्नाकने अप्रतिम पकडी केल्या. पूर्वार्धात अपयशी ठरलेल्या यू मुंबाच्या रिशांक देवाडिगाने दुसर्या सत्रात नेत्रदीपक चढाया केल्या.
