Breaking News

पर्यावरणसंतुलन ठेवण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची

परभणी/प्रतिनिधी, दि. 17 -  21 व्या शतकात जागतीक तापमानवाड, निसर्गाचे ढासळत चालले संतुलन, पर्यावरणाची होत असणारी हानी हा चिंतेचा  विषय बनला असुन पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे महत्व असल्याचे वास्तव सर्व मानवी समुदायाने  विचारात घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संतुलन राखने काळाची गरज असुन प्रत्येक मानवान आपल्या वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वृक्षांची लेकराप्रमाणे जपवणुक करावे जेणेकरुन सर्वांना स्वच्छ व शुध्दहवेची उपलब्धता करुन देणारे वृक्ष मानवी जिवन सुखी बनविण्यात महत्वाची भुमिका चांगल्या प्रकारे पार पाडतील. 21 व्या शतकामध्ये विज्ञानाच्या जोरावर मानवाने केलेला आधुनिक वैज्ञानिक स्वरुपाच्या विकासाचा उपभोगत घेत असतांना संपूर्ण मानवी समाज वनसंपत्तीला विसरुन जातो आहे की काय असा प्रश्‍न वाढत्या पर्यावरण असंतुलनातुन दिसुन येत आहे. असमान असे पर्जन्य मान, मान्सुनचा होत असलेला खंड आपल्या नैसर्गीक स्वरुपाच्या जिवनपध्दतींमध्ये बदल घडविणारा असुन प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजुन वृक्ष लागवड करणे काळाची गरज बनली आहे. सार्वत्रीक स्वरुपाचा विकास साध्य करतांना भौतिक सुख सुविधांचा उपभोग घेणारा संपुर्ण मानव अमृत संजीवनी वृक्षांच्या शितल छायेची थंडगार सावली विसरु लागला आहे,  वृक्षांपासुन  साखरेचा गोडवा असणार्‍या फळांचा गर बाटलीतुन चाखु लागला आहे. परंतु ज्या बाटलीतला गर कोणत्या फळांपासुन मिळतो आहे. त्याकडे मात्र आपण सर्वजन दुर्लक्ष करत आहोत. असे करुन चालणार नाही तर सर्वांची सामाजिक, पर्यावरण विषय जबाबदारीची जाणि ठेवून आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावावे त्याचे लेकरा प्रमाणे पालन-पोषण करावे आणि त्याच्या संपुर्ण जिवन घटकांचा उपभोग स्वतःसाठीच घ्यावा जेणेकरुन आपल्याला वृक्षांची किमया लक्षात येईल.  शासन स्तरावुरन वेगवेगळ्या  उपायोजना, मोहिमा, अभियान राबविले जातात. कुठलहही मोहिम, अभियान, उपाय योजनांमध्ये लोकसळभाग,  महत्वाचेा आहे. कोणतीही शासकीय योजना ही केवळ सरकारी अ से समजून कार्य केले तर ती योजना फलद्रुप होत नाही. जिथे लोकसळहभाग आहे तिथे ती योजना, मोहिम अभियान यशव्वीआहे. पर्यवरण संवर्धन हे राष्ट्रीय कार्य असुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व राष्ट्रोन्नतीसाठी सर्वसामान्यांनीही योगदान देणे काळाची गरज आहे.  निसर्गाने आपल्याला विपुल प्रमाणात वन संपत्ती दिली आहे. लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे मर्यादीत असलेल्या भौगोलिक क्षेत्रापैकी वहितीखालील व वनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. कमीत कमी क्षेत्रात जासतीत जास्त उत्पन्न काढणे व जेथे-जेथे वृक्षतोड झाली आहे तेथे- तेथे वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. आपणास फक्त झाड तोडण्याचे माहित आहे, लावण्याचे नाही, वृक्ष लागवड व संवर्धन हे फक्त शासनाचे काम नसुन .. हे काम आहे आपल्या सर्वांचे !  वृक्ष लागवड व संवर्धन करण्योच! निसर्गाने आपल्याला खुप काही दिले आहे. आपण मात्र त्यांची परतफेड करण्याचे सोजन्य पुरते विसरलो आहोत. निसर्ग आपणास प्राणावायु, फळे, फुले देतो, वृक्ष लागवडीमळे या परिसरातील तापमान इतर परिसरापेक्षा कमी राहते. झाडांमुळे पक्षांचा किलबिलाट ऐकू येवून परिसर निसर्गरम्य होतो. झाडांच्या सावलीखाली जनावरे विसावा घेतात व लहान मुले बागडतात. एवढेच नव्हे तर शुध्द ऑक्सीजन मिळतो. निसर्ग आपणास एवढे सर्वकाही देत असतांना निसर्गाची परतफेड म्हणून आपण निसर्गाला काय देतो? याचे आत्मपरिक्षण केले तर आपले उत्तर असेल.. काहीच नाही निसर्गालाही आपण काहीतरी दिले पाहिजे यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन सारखे कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. प्रत्येकाच्या घरासमोर दोन झाले किंवा प्रत्येक मुलामुलींच्या नावाने झाडे लावून त्या झाडांचे संगोपन मुलाप्रमाणे केले तर कोणतेही नगर किंवा शहर हिरवेगार होणस काहीच वेळ लागणार नाही. परीणी शहरातील गजानन नगर येथील नागरीकांनी लोकसहभागातून प्रत्येकाच्या घरासमोर दोन झाले लावून त्याचे मुलाप्रमाणे संगोपन केल्यामुळे हा परिसर हिवार गार झाला आहे. परभणी जिल्ह्यातील हे एक मॉडेल असुन यापासून इतर नागरीीकांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे व घेत आहेत. भविष्यातील पर्यावरणाचा धोका ओळखून आजपासूनच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सर्वजन एकत्र येवू या आणि पर्यावरणाचा समातोल राखु या.