जानकरांच्या मंत्रीपदाने परभणीत आनंदोत्सव
परभणी/प्रतिनिधी, दि. 17 - धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढत भाजपा ला राज्यात यश संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलणार्या रासपा नेते महादेव जानकर यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाने परभणी जिल्ह्यातील तमाम धनगर समाजने भेदा-भेद विसुन आनंदोत्सव साजरा केला.
भाजपाच्या यशात महाराष्ट्रातील धनगर समाजाचे अनन्यसाधारण असे महत्व असुन निवडणुक विजयानंतर महादेव जानकरांसह धनगर समाज नेत्यांची मंत्रीमंडळातील वर्णी निश्चीत असल्याचे मानल्या जात होते. परंतु महादेव जानकर यांचा मंत्रीमंडळात प्रवेश होण्यास लागत असलेला विलंब समाजाची दिशाभुल करणारा ठरत असल्याचे वास्तव सरकार आणि भाजपाच्या पचनी पडत नव्हते. दिवगंत भाजपा नेते गोपिनाथराव मुंढे यांच्या सकारत्मक हेतूने संपूर्ण समाज जानकरांच्या नेतृत्वात युतीमध्ये शामील झाला. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी महादेव जानकरांची यशस्वीता भाजपाला उघडपणे सांगीतली. यावरुन येत्याकाळात जानकर मंत्रीमंडळात दिसतील आणि तसे झालेच. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या रासपाच्या मुलुखमैदानी तोफ मंत्रीमंडळात दाखल झाली आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज हर्षउल्हासाने आनंदोत्सव साजरा करायला लागला. त्यातुन परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाने फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटली आणि बॅनर लावून आपल्या नेत्याच्या निवडीचे स्वागत अभिनंदन केले. त्यामुळे येत्याकाळा जिल्ह्यातील राजकारण धनगर समाज हा केंद्रस्थानि असे ल हे निश्चीत असुन जिल्ह्याची जबाबदारी ही उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी संपूर्ण धनगर समाजाने रासपाची दुरदृष्टी लक्षात घेवून रासपाला सदैव जिल्ह्यात साथ द्यावी अन्यथा समाज पुन्हा भरकटण्यास सुरुवात होईल. यासाठी धनगरसमाजाचे दिशादर्शक म्हणुन काम करण्याची क्षमता असणार्या रासपा च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे जेणेकरुन धनगर समाजाच्या नेत्यांचा उत्साह व्दिगुणीत होवून धनगर समाजाचे विभिन्न स्वरुपाचे हितकारक प्रश्ना मार्गी लागण्यास मदत होईल. दरम्यान महादेव जानकार यांच्या मंत्रमंंडळ समावेशाने जिल्ह्यातील रासपा कार्यकर्ते हर्षाने कामाला लागले असुन येत्या काळात रासपा जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मनपा परभणी, या सारख्या निवडणुकांतुन स्वतःची ताकद दाखवुन देईल यात काहीच शंका नाही. शिवाय गंगाखेड शुगरच्या माध्यमातुन जिल्ह्यातील शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गुट्टे इंडस्ट्रीजने आणि गंगाखेड शुगरने आपल्या उदिष्टांच्या जाहिरनाम्यातुन जिल्ह्यातील जनतेवर विकासाची छाया पांघरली आहे. त्यामुळे येत्या काळाता भाजपा-शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या बरोबरीने रासपाल यश संपादन करुन देण्यासाठी धडपड करणार्या नेत्यांची चांगली फळी परभणीत निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

