Breaking News

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या ः वंदनाताई निकम

बुलडाणा, दि. 23 - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निंदनीय हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्यांनी 21 जुलै रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून अत्याचार करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की समाजामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत संबंधित खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा, अत्याचार प्रकरणात सहभागी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी व दोषींविरुद्ध कडक कारवाई करून या कुटुंबाला न्याय देण्याकरिता आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना महिला जिल्हाध्यक्ष वंदना निकम, जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, गणेश भोसले, नितेश थिगळे, महिला संघटक कावेरी दळवी, शहराध्यक्ष बेबी घट्टे, गोदावरी वायाळ, लता टेकाळे, चंद्रकला नावकर, रेखा भागवत, सखुबाई उबरहंडे, पुष्पा चितारे, शशिकला टेकाळे, सिंधूताई ढेंग, ज्योती पारसकर, स्वाती सावळे, छाया बाजे, योगेश पाटील, अमोल देशपांडे, मंगेश राजपूत, अनंतराव सरोदे, चेतन मुळे यासह असंख्य शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.