पिक विमाची रक्कम कर्ज खात्यात कपात करू नकाः काँग्रेेस
बुलडाणा, दि. 23 - पिक विम्याची शेतक-यांच्या नावाने आलेली रक्कम परस्पर कर्ज खात्यात कपात करू नये अशी मागणी चिखली तालुका कॉग्रेसने सेंन्ट्रल बँकेकडे निवेदनाव्दारे केली आहे. तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी व काँग्रेस पदाधिका-यांनी 18 जुलै रोजी शेतक-यांच्या सोबत जावून सेंन्ट्रल बॅक शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली व शेतक-यांची हक्काची पिक विम्याची रक्कम कपात करून त्यांच्यावर अन्याय करू नये अशी आग्रही मागणी केली.
शाखा व्यवस्थापक चितलवार यांनी आतापर्यंत अशी रक्कम कपात केली नाही मात्र ज्या शेतक-यांवनी पुनर्गठण केले आहे अशांची पिक विमा रक्कम कर्जात कापून घेण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत असे पत्र दाखविले. त्यावर काँग्रेस पदाधिका-यांनी आक्रमक पवित्रा घेवून अशी कपात केल्यास संघर्षासाठी तयार राहा असा सज्जड दम भरला. त्यावर मी वरिष्ठ अधिकां-यांशी चर्चा करून कपात करणार नाही असे सांगितले. तसेच अडीच हजार खातेदार असल्याने आणि कर्मचारी संख्या कमी असल्याने पिक विमा देण्यास विलंब लागत आहे यासाठी दिलगिरी व्यक्त केली. आणि आठवडा भरात सर्व शेतक-यांचे पिक विम्याचे देण्याचे मान्य केले.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, माजी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, बाजार समिती सभापती विष्णू पाटील, संचालक भारत म्हस्के, ज्ञानेवर सुरूशे, यांच्यासह शेलगाव जहांगिर, भालगाव, एकलारा, सावरगाव डुकरे, पळसखेड आदि गावांचे शेतकरी बँकेत उपस्थित होते.