शहर भाजपातील गटबाजी कायम
अहमदनगर (प्रतिनिधी) । 10 - जिल्ह्यातील भाजपमध्ये गटतट असले तरी ते दिसून येत नाहीत. मात्र, शहरातील भाजपात असलेली गटबाजी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विशेषत: निवडणुकांमध्ये दिसून येते. नुकत्याच झालेल्या महापालिकेतील महापौर, उपमहापौर पदग्रहण समारंभातही गटबाजी कायम असल्याचे दिसले. या नेत्यांमधील वादामुळे भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर झाले मात्र, सेना, भाजप, भाजपातील अंतर्गत वादाचा मनपातील प्रशासन फायदा घेईल अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरु झाली आहे.
प्रशासनातील अधिकारी महानगरपालिकेला नेहमीच हुशार व बेरके मिळाले आहेत. पदाधिकार्यांमधील वादाचा ते पुरेपुर फायदा घेऊन निघून जातात. हे आत्तापर्यंतच्या अने
क प्रकरणात दिसून आले. त्यामुळे नेहमीच मनपातील आयुक्त वादग्रस्त ठरलेले आहेत. याला पदाधिकारीच कारणीभूत आहेत. मनपात तुल्लबळ असलेला एखादा गट अधिकार्यांशी जवळीक साधून कार्यभार उरकतात. तर एखादा गट अधिकार्यांवर आरोप ताशेरे ओढतात. अधिकारी दोन्ही गटांमध्ये भांडणे लावून आपला कार्यभार उरकतात. यामध्ये त्याचाच फायदा होतो. व शहर नगर विकासापासून दूर जाते. याचे खापर पालिकेतील सत्ताधार्यांवर फोडले जाते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. असाच प्रकार यापुढील भाजप सेनेच्या कार्यकाळात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी सेनेच्या हालचाली सुरु झाल्या. वरीष्ठ पातळीवरुन युतीचे स्पष्ट संकेत असल्याने सुरुवातीपासून भाजपातील अभय आगरकर यांचा गट माजी आ. अनिल राठोड यांच्या सेनेबरोबर होता, तर खा.दिलीप गांधी यांच्या गटाने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली होती. याच काळात गटनेते दत्ता कावरे यांची शहर जिल्हाध्यक्षांकडून हाकलपट्टी, नवीन गटनेते म्हणून सुवेंद्र गांधीची निवड तसेच उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपातील गांधी गट विरुध्द आगरकर गट समोरा-समोर येणे असे अनेक प्रकार घडले. त्यामुळे भाजपातील दोन गटातील संघर्ष विकोपाला गेला. महापौर निवडणुकीच्या दिवशी वरीष्ठ पातळीवरुन आदेश आल्यानंतर खा. गांधी गटाला अखेर माघार घ्यावी लागली. व निवडणुक बिनविरोध झाली. मात्र, उपमहापौर पदाचे उमेदवार कावरे यांना या तडजोडीतही माघार घ्यावी लागली. याचे शल्य आगरकर समर्थकांमध्ये आहे. मनपात झालेल्या पदग्रहण समारंभातही याचे पडसाद उमठले. सेनेचे महापौर सौ. सुरेखा कदम यांच्या पदभारासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम आले. यावेळी सुवेंद्र गांधी यांच्यासह उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याच्या समर्थकांचा मनपा आवारात प्रवेश झाला. याच दरम्यान, शिवसैनिकासह आगरकर गटाचे समर्थक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले. मात्र, गांधी समर्थक खा. दिलीप गांधी यांची वाट पाहत उभे होते. मनपाच्या प्रवेश द्वारासमोर सर्वच जण खासदाराजी प्रतिक्षा करत उभे राहिले. खासदार आल्यानंतर ते उपमहापौरांच्या दालनात निघाले असता ना. कदम यांनी बाहेरच छिंदम यांना शुभेच्छा देऊन ते मनपा आवारातून बाहेर पडले. दरम्यान, महापौर सौ.कदम या महापौर दालनात जाऊन त्यांनी सेनेचे नेतेमंडळी, पदाधिकारी व आगरकर गट समर्थकांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणला होता.
पहिल्यादाच महापौरांच्या दालनात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, ना.एकनाथ शिंदे, माजी आ. अनिल राठोड यांच्या प्रतिमा होत्या. त्याच्या प्रवेशानंतर खा. दिलीप गांधी समर्थकांच्या उपस्थितीत उपमहापौर छिंदम यांनी पदग्रहण केले. त्याच्या दालनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच प्रतिमा लावण्यात आली होती. खासदार गांधीची कोणतीही प्रतिमा तेथे दिसली नाही त्यामुळे छिंदम नेमके कोणाचे प्रतिनिधीत्व करतात, याबाबत ही चर्चा सुरु होती. सेनेच्या पदग्रहण समारंभावेळी अभय आगरकर , दत्ता कावरे, सचिन पारखी, यांच्यासह आगरकर समर्थक उपस्थित होते. मात्र, उपमहापौरांच्या पदग्रहण प्रसंगी आगरकरांची उपस्थिती जाणवली नाही. त्यामुळे दोन्ही गटांमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. उपमहापौर छिंदम यांनी पदभार स्विकारतांना कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाही. मात्र, पदभारानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी पत्रकाराशी संवाद साधून आपले म्हणणे मांडण्याची संधी सोडली नाही. या वार्तालाभातही दोन्ही गटातील मतभेद स्पष्टपणे दिसून आले.