Breaking News

सी.सी.टी.व्ही. क्षेत्रात जिल्ह्यातील अग्रगण्य मंदार मुळे दालनास आय.एस.ओ. प्राप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) । 10 - सी.सी.टी.व्ही. होम अ‍ॅण्ड ऑफिस सिक्युरिटी व ऑटोमेशन क्षेत्रात अग्रणी असलेल्या नगरमधील सुप्रसिद्ध  ‘मंदार मुळे सी.सी.टी.व्ही. दालनास’ आय.एस.ओ. 9001ः2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सी.सी.टी.व्ही. उद्योगात जिल्ह्यात पहिल्यांदाच मंदार मुळे यांनी हे प्रमाणपत्र मिळवण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या या उपलब्धतेबद्दल मंदार मुळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम नगरला कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी सार्वजनिक सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसवण्यासाठी कशाप्रकारे अत्याधुनिक यंत्रणा आपण राबवू शकतो, तसेच या क्षेत्रात आणखी काय नवे संशोधन झाले आहे, याबद्दल मंदार मुळे यांनी ना. कदम यांना माहिती दिली.
आय.एस.ओ. 9001ः2015 प्रमाणपत्र मंदार मुळे यांच्या दालनास मिळाल्याबद्दल त्यांचे ना. कदम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. कदम यांच्या हस्ते मुळे यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक विक्रम राठोड, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.
गेल्या 10 वर्षांपासून मंदार मुळे हे सी.सी.टी.व्ही. उद्योगात संपूर्ण जिल्हाभर कार्यरत  असून, सरकारी, निमसरकारी कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत केले आहेत. विविध समाजोपयोगी उपक्रमांत त्यांचा सी.सी.टी.व्ही.च्या मार्फत सेवेद्वारे सहभाग असतो. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.