Breaking News

युवा मोर्चाचा ‘आसूड’ आंदोलनाचा इशारा

। न्यू आर्टस, कॉमर्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक पिळवणूक, अन्याय त्वरीत थांबवा ः उमेश साठे

अहमदनगर, दि. 10 - अहमदगनर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज मध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमासाठी ग्रंथालय डिपॉझिट, इंटरनेट फी, नियत कालीन, पार्किग फी, प्रवेश फॉर्म विक्री फी अशा माध्यमातून शुल्क आकारले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अर्थिक पिळवणूक कॉलेज करीत असून एक प्रकारे हा अन्यायच आहे. हि आर्थिक पिळवणूक त्वरीत थांबवावी अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कॉलेजमध्ये आसूड आंदोलन करु असा इशारा नगरशहर जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे यांनी दिला आहे. 
वरील विषयांन्वये सविस्तर मुद्देसुद माहितीचे निवेदन प्राचार्य भास्कर झावरे यांना देऊन या प्रकरणी विद्यार्थ्यांकडून  जादा आकारलेली फी परत देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी श्री. साठे यांनी केली आहे. या निवेदनाबाबत प्राचार्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण तो असमाधानकारक असून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे श्री.साठे यांनी यावेळी सांगितले.
आपल्या निवदेनात ते म्हणतात शिक्षण समितीने शुल्क निश्‍चित केली असताना येथे शुल्क अधिक आकारले जातात. प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रथम  वर्षी घेतलेले डिपॉझिट रक्कम नियमित पणे वाटप होत नाही. जे विद्यार्थी इंटरनेट वापरीत नाही त्यांची ती फी परत द्यावी. काही विद्यार्थी बसने, पायी येतात त्यांना पार्किंग फी कशासाठी? असा प्रश्‍न करुन श्री.साठे यांनी एकूण विद्यार्थी किती कोणत्या नावाखाली किती किती रुपये आकारले जातात. याचा पावत्यांसह तपशिल कॉलेजकडे निवदेन देऊन त्यांच्या पावत्यांसह कॉलेज कडे निवेदने देऊन आर्थिक पिळवणूक कशी होते हे दाखविले. जादा शुल्क आकारणे हा बेकायदा गुन्हा आहे. कॉलेज गुणवत्तेच्या नावावर विद्यार्थी येथेच प्रवेश मिळावा. म्हणून या आर्थिक पिळवणूकीचा भार सहन करीत आहे. यामुळे कॉलेजचे फावले जाते. पण काही गोर गरीब विद्यार्थी मात्र हा अन्याय निमुटपणे सहन करीत आहेत. त्यांना न्याय मिळाविण्यासाठीच भाजपा युवा मोर्चा हा लढा देत असल्याचे साठे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती संस्थेच्या काही पदाधिवकार्‍यांना देऊन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण शुल्क समिती, पालकमंत्री, आणि संस्थेच्या कॉलेज प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. 2 दिवसामध्ये कॉलेजने निर्णय घेतला नाही तर आसूड आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.