दूषित पाण्याची तपासणी करा : आरोग्यमंत्री
मुंबई, दि. 12 - पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असते. मागील वर्षाप्रमाणे यंदाही जलजन्य आजारांची लागण झालेल्या रुग्णांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पाण्याच्या स्रेतांचे मॅपिंग करा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
साथींच्या आजाराच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता पालिका रुग्णालयांत रुग्णांवर कशाप्रकारे उपचार सुरू आहे, हे पाहण्यासाठी सोमवारी डॉ. सावंत यांनी अचानक महापालिकेच्या कांदिवली व गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयांना भेट देऊन औषधसाठा व रुग्णांची विचारपूस केली. या भेटीदरम्यान उपचार घेत असलेले सर्वाधिक रुग्ण गॅस्ट्रोचे असल्याचे आढळून आले. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरणार्या या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहा, असे सांगत पाण्याच्या स्रेतांचे मॅपिंग करण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.