Breaking News

ठाण्यात खुलेआम वेश्याव्यवसाय!

ठाणे, दि. 12 - पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालये असलेल्या ठाणे शहरात सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू आहे. या वारांगनांकडून पोलीस नियमित हप्ते घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या अनेक गजबजलेल्या भागांत या वेश्या उघडपणे रस्त्यावर गि-हाईक शोधत उभ्या असतात. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
काही दिवसांत ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागांत धाडी टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्याच्या बातम्या येत आहेत. यासाठी ठाणे गुन्हे शाखेची एक विशेष शाखाही कार्यरत आहे. मात्र त्यांना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरातील हे ‘धंदे’ कसे दिसत नाहीत? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.