Breaking News

धा.बढे येथील जखमींना जिल्हाधिकारी यांची सात्वनपर भेट

बुलडाणा (प्रतिनिधी), बुलडाणा, दि. 14 - मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील वर्‍हाडी मंडळींच्या वाहनाला अकोल्याजवळील व्याळा येथे काल भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये धामणगाव बढे येथील तीन जण जागीच ठार झाले, तर काही जण गंभीर जखमी झाले. या जखमींची जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात जावून सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि जखमींवर उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रशासनाच्यावतीने सहकार्याचे आश्‍वासन दिले.
     जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे आपल्या कुटूंबासमवेत
बुलडाणाकडे येत होते. त्यावेळी रस्त्यातच जिल्हाधिकारी यांना आपल्या जिल्ह्यातील वर्‍हाडी मंडळीच्या वाहनाला अपघात झाल्याचे कळाले. तात्काळ जिल्हाधिकारी यांनी आपले वाहन सर्वोपचार रूग्णालयाकडे वळविण्यास सांगितले. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. जिल्हाधिकारी यांनी आपल्या कुटूंबासमवेत  सर्वोपचारच्या अपघात कक्षात जखमींची भेट घेतली.  तसेच सर्व जखमींच्या कुटूंबाची विचारपूस केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत त्यांच्या पतक्ी श्रीमती उज्वला झाडे, अकोला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, अकोल्याचे तहसीलदार रामेश्‍वर पूरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते, प्रशासन अधिकारी विजय देशमुख व वैद्यकीय अधिक्षक डॉ. नैताम आदी उपस्थित होते.