Breaking News

शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

बुलडाणा, दि. 14 - महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात राबविणे बाबत शासन निर्णय 5 जुलै, 2016 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्याकरीता खरीप हंगामातील भात, कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, तिळ, ख.ज्वारी, ख. भुईमूग या 9 पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना सहभागी होता येते. शेतकर्‍यांनी संपुर्ण माहीती भरलेला अर्ज 31 जुलै, 2016 पुर्वी विमा हप्त्यासह बँकेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत पिकांसाठी नुकसान भरपाई करीता तूर, चक्रीवादळ, भूस्खलन, गारपिट, नैसर्गिक आग, विज कोसळणे, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग ईत्यादी बाबी समाविष्ट असून त्याचप्रमाणे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान तसेच हवामान घटकाचे प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान व काढणी पश्‍चात नुकसान ईत्यादी बाबींकरीता नुकसान भरपाई देय आहे.
अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयांशी संर्पक साधावा. शेतक-यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रमोद लहाळे  यांनी कळविले आहे.