वीज तारांचा स्पर्श लागल्याने दोघा भावंडांचा मृत्यू
जळगाव, दि. 22 - यावल येथे शेती शिवारात तुटलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने, दोन गुराखी भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भालशिव रस्त्यावरील सूर नदीपात्रात घडली. भावांच्या मृत्युमुळे तीन जण मानसिक धक्क्याने बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विकास रमेश भिल्ल (20) आणि कृष्णा रमेश भिल्ल (15) अशी या मृत युवकांची नावे आहेत. घनश्याम रमेश भिल्ल (26 ), प्रकाश रमेश भिल्ल (20) व दीपक अण्णा भिल्ल (24) यांना घटना समजताच ते बेशुद्ध पडले.
साने गुरुजी शाळेजवळील भिल्ल वाड्यातील रहिवासी विकास व कृष्णा शेळ्या, गुरे चारण्यासाठी सूर नदीपात्रात गेले. नदीपात्रात वीज वाहिनीच्या तुटलेल्या तारेचा दोघांना स्पर्श झाला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तर तीन बेशद्ध युवकांवर डॉ. कौस्तुभ तळेले यांच्याकडे प्रथमोपचार करून त्यांना जळगावला हलविण्यात आले.