जन्मदात्रीनेच केला घात ; आईने विकले 11 वर्षाच्या मुलीस
औरंगाबाद, दि. 22 - दोन विश्वासाच्या नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना शहरात घडली आहे. देहविक्रय करणार्?या आंतरराज्यीय टोळीला स्वत:च्या 11 वर्षीय मुलीला आई आणि मावशीनेच दलालाच्या माध्यमातून अडीच लाखात विकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.राजस्थानमध्ये एका शहरात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा मारला तेव्हा, तेथे औरंगाबादेतील ही चिमुकली पोलिसांना आढळली. राजस्थान पोलिसांच्या कारवाईमुळे औरंगाबादेतील ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्या निर्दयी आई, मावशी, दलाल आणि मुंबईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मुली मुकुंदवाडीतील रेल्वे रुळ परिसरात राहतात. या दोन्ही मुली संगोपन आणि शिक्षणासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी तिने छावणीतील विद्यादीप बालगृहात दाखल केलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे 14 एप्रिल रोजी सुशीला आणि नितीन हे बालगृहातून दोन्ही मुलींना घरी घेऊन गेले. या दोन्ही मुलींना त्यांच्यासोबत पाठविण्यास बालगृहाच्या अधीक्षिका तयार नव्हत्या. त्यावेळी त्यांनी वॉर्डन यांच्याशी भांडण करून शाळेतून टी.सी. काढून घेतल्या आणि दोन्ही मुलींचे आम्हीच शिक्षण करणार असल्याचे तिच्या आईने सांगितले.