Breaking News

सत्याचा मार्ग दाखवण्याचे साधन सत्संग !प.पू.समन्वय साधिका

जालना, दि. 22 - टीव्हीवर आपण प्रवचन ऐकू शकतो मात्र सत्संग नाही. सत्संगात जे शिकायला मिळते ते टीव्हीवरील प्रवचनातून मिळत नाही. मात्र सत्संग हे असे साधन आहे की,  त्या ठिकाणी आपण बरेच काही शिकू शकतो. जीणवाणीचा लाभ सत्संगातच मिळतो. सत्याचा मार्ग दाखवण्याचे एकमेव साधन हे सत्संगच आहे, असा हितोपदेश  समन्वय साधिका श्रृतवारिधी महासाध्वी श्री प्रियदर्शनाश्रीजी म. सा. यांनी येथे बोलतांना केला.येथील श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघांच्यावतीने  आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास कल्प आराधना पर्वातील प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर तत्वज्ञ साधिका प. पू. श्री विचक्षणाश्रीजी म.  सा; स्वाध्याय साधिका प. पू. श्री सुकृतिश्रीजी म. सा; संयम साधिका प. पू. सुप्रज्ञप्तिश्रीजी म. सा. आदि ठाणा- 4 आदींची उपस्थिती होती.दूरदर्शनवरील प्रवचन  आणि सत्संगातील फरक स्पष्ट करुन सांगतांना प.पू.समन्वय साधिका प्रियदर्शनाश्रीजी म. सा. म्हणाल्या की, दूरदर्शनवरील प्रवचन ऐकतांना कुणी सामायिक  करत नाही, दूरदर्शन एका विशिष्ट चौकटीत असल्याने त्या ठिकाणी धार्मिक आणि प्रसन्न वातावरणही नसते.