जळगावच्या एसपींना मानवी हक्क आयोगाचा समन्स
जळगाव, दि. 22 - संशयीत म्हणून एकाला तुरूंगात डांबून ठेवल्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना राज्य मानवी हक्क आयोगाने समन्स बजावला आहेत. त्यांना 21 जुलै रोजी सकाळी मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोहारा, ता.पाचोरा येथील शांताराम दगडू बेलदार यांनी तक्रार केली होती. त्यात महाराष्ट्र शासन, सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव, हेड कॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण व व्यावसायिक ज्ञानेश्वर दिनकर कुमावत यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. अवैध धंद्याविरुद्ध आवाज उठविल्याच्या रागातून पिंपळगाव पोलिसांनी खोटी केस दाखल करून, नानूराम दगडू बेलदारांना डांबल्याचा आरोप तक्रारीत आहे. समन्स मिळाल्यावर तारखेला हजर राहू, तक्रारदार एका गुन्ह्यात रेकॉर्डवर फरार आहे अशी, माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे.