अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; पंचेवीस लाखाच्या अनुदानावरून वाद
पुणे, दि. 22 - पिंपरी-चिंचवड येथे जानेवारी महिन्यात झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेले 25 लाख रुपयांचे अनुदान वापरात आले नाही. त्यामुळे ते सरकारला परत करावे, असा प्रस्ताव साहित्य महामंडळाच्या बैठकीत मांडल्याने या विषयावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे 25 लाखांच्या निधीचे भिजत घोंगडे अजूनही शिल्लक असल्याचे दिसून आले आहे.
नागपूर येथे रविवारी साहित्य महामंडळाची बैठक झाली. बैठकीत विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर ऐनवेळी विषय मांडण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, त्याला अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी परवानगी नाकारली. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद याघटक संस्थांसह हैदराबाद आणि बडोदा येथील प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनीही या दोन्ही संस्थांची भूमिका योग्य आहे, असे मत व्यक्त केले.