डिसीसी बँकेचे माजी संचालक मेघराज आडसकरांची आत्महत्या
बीड, दि. 22 - बीड जिल्हा बँकेचा भष्टाचार देशभर गाजत असताना बँकेचे माजी संचालक तथा माजी आमदार मेघराज आडसकर यांनी निर्दोष असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.बँक प्रकरणात माझ्यासह सर्वजण निर्दोष असून, याप्रकरणी केवळ बँकेचे दोन माजी अध्यक्ष हेच जबाबदार आहेत, असा उल्लेख आडसकर यांनी केला आहे. या चिठ्ठीत जबाबदार दोन्ही अध्यक्षांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. आडसकर यांची स्वत:ला पेटवून घेऊन घेऊन आत्महत्या केली. बँक घोटाळ्यातील चौकशीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.