Breaking News

अमेरिकेत आंदोलकांच्या गोळीबारात पाच पोलीस अधिकारी ठार

ह्यूस्टन, दि. 09 - अमेरिकेतील डल्लास शहरात अश्‍वेत आंदोलकांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात पाच पोलीस अधिकारी ठार तर सात जण जखमी झाले. या  हल्ल्याने अमेरिका हादरली असून अध्यक्ष बराक ओबामा हे या हत्याकांडाने व्यथित झाले आहेत.
पोलिसांनी या आठवडयात एका अश्‍वेत व्यक्तीला ठार केल्याच्या निषेधार्थ आंदोलकांतर्फे आंदोलन सुरू आहे. डल्लासचे पोलीसप्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी सांगितले  की, शहरातील अत्यंत गर्दीच्या भागात असलेल्या डाऊनटाऊन या गगनचुंबी इमारतीवर लपलेल्या चार हल्लेखोरांनी स्नायपरच्या सहाय्याने 11 पोलिसांवर गोळीबार  केला.