Breaking News

घरांच्या किमतीत घसरण

नवी दिल्ली, दि. 09 -  मोठ्या महानगरांमध्ये स्वत:च्या हक्कांच्या घरांचे स्वप्न आवाक्यात नसल्याचे नेहमीच चर्चिले जाते. परंतु आता परिस्थितीत बदल झाला  आहे. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या घरांच्या किमतीबाबतच्या निर्देशांकावरून असे दिसते की, घरांच्या किमती खूपच घसरल्या आहेत.
2015-16 या दरम्यान जानेवारी ते मार्च दरम्यान कालावधीसाठीचा हा निर्देशांक काढला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, अहमदाबाद, लखनौ,  जयपूर, कानपूर आणि कोची या शहरांसाठी हा निर्देशांक काढला आहे. मुंबईत मात्र घरांच्या किमती चढल्याच आहेत.
मार्चच्या तिमाहीत वाढीचा दर कमी झाला असून 5.2 टक्क्यावर उतरला आहे. एका वर्षापूर्वी हाच दर 17.5 टक्के होता. घरांच्या किमती कोसळण्यात जयपूर  आघाडीवर असून तेथे सर्वाधिक किमती खाली आल्या आहेत. जयपूरमध्ये एचपीआय 10.3 टक्क्यांनी कमी झाला असून त्यापाठोपाठ कोची (5.5 टक्के), कानपूर  (1.7 टक्के), कोलकता (1.2 टक्के) असा क्रम लागतो.