‘जंक फूड’वर केरळचा 14.5 टक्के ‘फॅट टॅक्स’
अनंतपूरम, दि. 09 - पिझ्झा, बर्गर, वडापाव, तेलकट तुपकट वेफर्स, वडापाव, भजी आदी आरोग्याला हानिकारक ठरणा-या सर्वच जंक फूडवर 14.5 टक्के ‘फॅट टॅक्स’ लावण्याचा ऐतिहासिक निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.
देशात हे धाडस करणारे केरळ हे पहिलेच राज्य ठरले आहे. त्याचबरोबर प्रदूषण करणा-या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 10 वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर ‘हरित’ कर लादला आहे.
राज्यात सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडी सरकारचे अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात आरोग्याला हानिकरक ठरणा-या पदार्थावर कराची कु-हाड चालवली आहे.
देशात ‘जंक फूड’चे प्रमाण वाढत आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता, वेफर्स, रिंगा आदी पदार्थामुळे जाडजूडपणा वाढत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेषकरून लहान मुले या जंक फूडच्या आहारी जात आहेत.