मेहेरबाबा प्रेमींनी पाळला जगभरात मौन दिन समाधी स्थळी हजारो मेहेरप्रेमींची उपस्थिती
अहमदनगर, दि. 12 - अवतार मेहेरबाबानी 10 जुले 1925 पासून पुढील 44 वर्षे मौन ठेवले म्हणूंन मेहेरबाबा प्रेमींनी रविवारी जगभरात मौन दिन पाळला, नगर जवळील दौंड रोडवरील समाधी स्थळी व परिसरात हजारो मेहेरप्रेमींची उपस्थित होते व 24 तास मौन पाळले दिवस भर भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती तर परिसरात भाविक बसून होते यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली. तरी समजेल इतकी शांत वातावरण होते रविवरी हजारो भाविकाचे मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी दिवसभर मौन पाळले आहे.
नगर जवळील दौर रोडवरील अरणगाव येथील मेहराबाद येथे रविवारी मौन दिना निमित्त भाविकांनी या समाधी स्थळाला भेट दिली. रविवारी या कार्यक्रमासाठी राज्यातुन तसेच देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.