चांगल्या विचारातून समाज प्रबोधन होते ः जिल्हाधिकारी कवडे
अहमदनगर, दि. 12 - जगातील सर्वच धर्म शांतता व बंधुभावाची शिकवण देत असतात. सर्व धर्मियांनी आपापले सण एकमेकांसमेवत साजरे केल्यास परस्पर स्नेह वृध्दींगत होण्यास मदतच होते. रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त समाजात जागृती आणण्यासाठी काढण्यात येणारे विशेषांक महत्त्वाचे आहेत. नगरमधून प्रकाशित होणार्या अहमद - नगर इन्साफने सलग पाचव्या वर्षी रमजान विशेषांक काढून समाजासमोर विचारांचा आदर्श ठेवला आहे. अशा विचारातूनच खरे लोकप्रबोधन साध्य होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. अहमदनगर इन्साफ या रमजान विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रांताधिकारी उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी वामन कदम, तहसिलदार सुधीर पाटील, आदिंसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कवडे पुढे म्हणाले, साप्ताहिक इन्साफतर्फे दरवर्षी रमजान विशेषांकात वेगवेगळे विषय हाताळण्यात येतात. अंकाचा दर्जा व त्यातील मजकूर वाचनीय असून संपादक इकबाल शेख यांनी त्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. पोलिस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी म्हणाले, सध्या सर्वत्र नकारात्मक विचारांचा फैलाव वेगाने होत आहे. असे विचार थोपविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असते. साप्ताहिक इन्साफ सातत्याने समाजात सकारात्मक विचार पोहचविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही शुभेच्छापर भाषणे झाली. संपादक इकबाल शेख यांनी रमजान विशेषांकाची माहिती देताना सांगितले की, साप्ताहिक इन्साफ मागील पाच वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे विषय समोर ठेवून विशेषांक प्रकाशित करीत आहे. यंदा व्याज एक आर्थिक दहशतवाद, या विषयावर विशेषांक प्रकाशित केला आहे. मान्यवरांच्या लेखांचा विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.