Breaking News

मेजर जनरल पृथ्वी सिंह यांची ’मिलिटरी कॅन्टीन’ला भेट

सातारा, दि. 09 -  दक्षिण महाराष्ट्र सब एरिया पुण्याचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल पृथ्वी सिंह यांनी सातारा येथील सीएसडी कॅन्टीनची पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. कॅन्टीनमध्ये कार्डधारकांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा, सेवांची पाहणी करत व्यवस्थापक कर्नल शरद केंजळे यांच्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र सब एरिया पुण्याचे जनरल ऑफिसर कमांडिंग पद स्वीकारल्यानंतर मेजर जनरल पृथ्वी सिंह यांनी पहिल्यांदाच सीएसडी कॅन्टीनला भेट दिली. त्यांचे व्यवस्थापक कर्नल शरद केंजळे यांनी स्वागत केले. यावेळी जनरल निवृत्त अरुण पवार, कर्नल शिवाजी घाडगे, स्न्वॉड्रन लिडर मुतालिक, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, कॅन्टीनचे सहाय्यक व्यवस्थापक डी. एम. सावंत, किरण राजेमहाडिक, कार्डधारक माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.