Breaking News

सेवा गौरव पुरस्काराने श्री सेवागिरी देवस्थान सन्मानित

पुसेगाव, दि. 09 (प्रतिनिधी) - पुणे येथील स्व. चिमणलाल गोविंददास मेमोरीयल ट्रस्टकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टला सेवा गौरव पुरस्कार 2016 ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संस्थापक विश्‍वनाथ कर्‍हाड यांच्या हस्ते मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी पुस्काराचा स्वीकार केला. 
कार्यक्रमास श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त मोहनराव जाधव, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, माजी विश्‍वस्त बाळासाहेब जाधव, ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय जाधव, स्व. चिमणलाल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच बाळासाहेब जाधव, प्रताप जाधव, राहुल जाधव, लक्ष्मण जाधव, राजेश देशमुख, दिलीप जाधव, अशोक तोडकर, वैभव जाधव, दीपक जाधव, उत्तम जाधव, विशाल माने, पुसेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या येरळा नदी पुनरुज्जीवन, जलसंधारण व वनीकरण, शैक्षणिक विकासासाठी व लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित केलेले विविध उपक्रम, समाज प्रबोधनासाठी सुरू असलेली व्याख्यानमाला तसेच यात्राकाळात होणारे समाजोपयोगी उपक्रमाबाबत ट्रस्टची सेवा गौरव 2016 या पुरस्कारासाठी निवड झाली होती.