किशोर दर्डा यांच्या पोलीस कोठडीत वाढ
यवतमाळ, दि. 06 - स्थानिक ‘यवतमाळ पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेल्या संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
सोमवारी दर्डा यांना नागपूरमधून अटक करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांना यवतमाळ सत्र न्यायालयात उभे करण्यात आल्यानंतर आणखी दोन दिवस त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.
बुधवारी या प्रकरणी नव्याने एक गुन्हा दाखल झाल्याने किशोर दर्डा यांच्या अडचणीत भर पडली आहे. अत्याचाराची माहिती असतानाही संबंधित यंत्रणेला न कळवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.