Breaking News

शेतक-यांना आता 7 टक्के दराने कर्ज

नवी दिल्ली, दि. 06 - यंदाच्या आर्थिक वर्षात शेतक-यांना अल्प मुदतीसाठी 7 टक्के व्याजदराने पीककर्ज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. तीन  लाखांपर्यंत कर्ज शेतक-यांना मिळणार आहे.
सातपैकी दोन टक्के व्याजावर अनुदान मिळणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतील त्यांना कर्जावर केवळ चार टक्केच व्याज द्यावे लागेल.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
यंदा केंद्र सरकारने शेतीसाठी 9 लाख कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्याचे
ठरवले आहे.