भाजपच्या सावकार नगरसेवकाने व्याजाच्या पैशासाठी पाजले महिलेला विष
औरंगाबाद, दि. 17 - व्याजाने दिलेली रक्कम परत घेण्यासाठी भाजपच्या सावकार नगरसेवकाने शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी सरपंच महिलेला विष पाजले. ही घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे गुरुवारी घडली असून पुष्पा शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सावकारी करणार्या भाजपच्या अप्पासाहेब हिवाळे या नगरसेवकासह त्याच्या 12 साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोंदलगाव येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश शिंदे यांनी कामानिमित्त औरंगाबाद येथील भाजपचे नगरसेवक विनायक हिवाळे यांच्याकडून 2005 मध्ये 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेच्या बदल्यात शिंदे यांनी आपले कोरे धनादेशही हिवाळे यांना दिले होते. 2008 मध्ये शिंदे यांची आर्थिक स्थिती बिघडल्याने ते रकमेचे व्याज भरू शकले नाही.