भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मीरा भाईंदर येथे अनावरण
ठाणे, दि. 17 - मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे एमटीएनएल ऑफिससमोर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले तसेच राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले.
या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री रामदास बडोले, खासदार राजन विचारे, महापौर मीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. बरीच वर्षे या पुतळ्याचे उभारणीचे काम थांबले होते ते स्वप्न साकार होत असुन केवळ दलित समाजातीलच नव्हे तर मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांना याचा आनंद होत आहे अशी भावना सर्वच वक्त्यांनी बोलून दाखविली.