Breaking News

मुंबई-गुजरात रेल्वेमार्गावर मालगाडीचे डबे घसरले

मुंबई, दि. 04 - मालगाडीचे डबे डहाणू-वाणगावदरम्यान घसरले असून घसरलेले डबे-रूळावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पण अद्याप या प्रयत्नांना यश न आल्याने मुंबई-गुजरात रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना रात्री उशीरा 2.30 च्या सुमारास घडली असून, मालगाडीचे एकदोन नव्हे तर, तब्बल 11 डब रुळावरुन घसरले आहेत. दरम्यान, कोणतीही जिवीत हानी या अपघातात झाली नाही. तसेच, याचा कोणताही परिणाम पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई लोकल वाहतुकीवरही झाले नाही. पश्‍चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे.