Breaking News

भारतात नोकरीसाठी ‘गुगल इंडिया’ सर्वोत्तम

नवी दिल्ली, दि. 04 - भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडियाला पहिला मान मिळाला आहे. कर्मचार्‍यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसर्‍या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात अमेरिकन एक्सप्रेस इंडिया चौथ्या तर उज्जीवन फायनान्स तब्बल चोवीसाव्या क्रमांकावर होती.