केमिकल मिश्रीत पाण्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात
अहमदनगर (प्रतिनिधी)। 08 - महापालिकेने शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत केडगाव औद्योगिक वसाहतीतून नव्याने जलवाहिनी टाकली. त्यामुळे वसाहतीतील ड्रेनेजलाईन ठिकठिकाणी फुटली असून, कारखान्यांचे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे कारखान्यांत काम करणार्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरासह उपनगरांत नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महापालिकेने एकता, ताराबाग वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी केडगाव औद्योगिक वसाहतून दोनशे एमएम व्यासाची जलवाहिनी टाकली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. जलवाहिनी गाडण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या सहय्याने मोठी नाली खोदण्यात आली. ही नाली खोदत असताना रस्त्याच्या बाजूची ड्रेनेजलाईन व त्यावरील सहा चेंबर फुटले आहेत. हे चेंबर फुटून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. वसाहती प्रशासनाकडून ड्रेनेज दुरुस्तीसाठी महापालिकेला पत्र दिले. वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. परिणामी कारखान्यांत निर्माण होणारे रसायनयुक्त पाणी रस्त्यावर आले आहेत. औद्योगिक वसाहतीतून जलवाहिनी टाकण्यात आली. महापालिकेने नियुक्त ठेकेदाराने हे काम केले आहे.पण, जलवाहिनी टाकताना ड्रेनेजलाईनची दुरुस्ती करण्याची नेमकी जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.