मागण्या मान्य झाल्याने जलशुध्दीकरणच्या कर्मचार्यांचे उपोषण मागे
कराड, दि. 05 (प्रतिनिधी) - कराड येथील नगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील 46 कर्मचार्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सह्याद्रि श्रमिक महासंघाच्यावतीने उपोषण सुरु केेले होते. रविवारी चौथ्या दिवशी पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, विनायक पावसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर कर्मचार्यांच्या चार मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र प्रशासनाने दिल्यानंतर रविवारी उपोषणकर्त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व अॅड. भरत पाटील यांच्या हस्ते सरबत देवून उपोषण मागे घेण्यात आले.
जलशुध्दीकरण केंद्रातील मक्तेदारामार्फत काम करणार्या सर्व न्यायप्रविष्ठ कर्मचारी व मुख्याधिकारी विनायक पावसकर यांच्यात आमरण उपोषणादरम्यान मागण्यांबाबत चर्चा झाली होती. यामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील मक्तेदारामार्फत काम करणार्या कर्मचार्यांची विशेषबाब म्हणून नगरपालिका अध्यक्षांकडे अहवाल पाठवून ठराव करुन तो शासनास पाठवणे, उच्च न्यायालयाकडून येणारा निकाल कराड नगरपालिका व मक्तेदारामार्फत काम करणार्या इतर विभागात काम करणार्या सर्व न्यायप्रविष्ठ कर्मचार्यांना ठेकेदारांमार्फत समाविष्ठ करुन घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे पत्र पालिका प्रशासनाने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, घन:श्याम पेंढारकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख तेवरे, मोहन बेंद्रे, सचिन कदम, लक्ष्मण खांडे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक पवार, सत्याप्पा गोरडे यांच्यासह सह्याद्री श्रमिक महासंघाचे पदाधिकारी, सतीश तावरे, मनसेचे विकास पवार, सागर बर्गे, महेश जगताप उपस्थित होते.