Breaking News

लोकशाही दिनात 26 तक्रारी प्राप्त

बुलडाणा, दि. 05 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार आज 4 जुलै 2016 रोजी लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. विजय एन झाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.  लोकशाही दिनात एक तक्रार निकाली निघाली असून  असून 26 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या लोकशाही दिनात 26 तक्रारीवर सुनावणी होवून 25 तक्रारी सामान्य तक्रार म्हणून संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत. निकाली निघालेल्या तक्रारींमध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडील तक्रारीचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींपैकी एक तक्रार लोकशाही दिन कार्यवाहीत स्वीकृत करण्यात आली आहे.  
लोकशाही दिनाच्या कार्यवाहीला जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडेकर, जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.