अभिषेक कृष्णा नवे आयुक्त
नाशिक/प्रतिनिधी। 09 - नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची नुकतीच मुंबईला बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्तव्यतत्पर ख्याती असलेल्या आयुक्तांच्या
बदलीचे आदेश आल्यानंतर नाशिककर मात्र संतापले असून, शासनाच्या निर्णयाविरोधात मेहेर सिग्नलवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर आप पक्षाच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. केवळ वीस महिन्यांचा कार्यकाळ मिळालेल्या गेडाम यांनी सुरुवातीपासूनच नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयऋकेला. त्यासाठी त्यांनी बिल्डर लॉबीला प्रथमपासूनच विरोध केला होता. सिंहस्थातील उत्कृष्ट कार्याबद्दलही त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय महापालिकेतील अधिकार्यांसह नगरसेवकांनाही त्यांनी शिस्तीच्या चौकटीत अडकवले होते. सिंहस्थाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली होती. पारदर्शक कारभार करण्यासाठी त्यांनी मनपाचा सर्व कारभार ऑनलाइन केला होता. शहरातील अतिक्रमणप्रश्नी कठोर भूमिका घेत त्यांनी थेट नगरसेवकांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. केवळ 20 महिन्यांच्या कारकिर्दीत स्मार्ट नाशिकसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनीही त्यांची पाठ थोपटली होती. त्यांना शासनदरबारी मान-सन्मानही मिळाले होते. जवळपास सर्वच क्षेत्रातून आयुक्तांवर कौतुकाची थाप पडत असताना अलिकडेच त्यांच्या बदलीचे वृत्त अधूनमधून प्रसारित होत होते; परंतु ती केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आजच्या बदलीबाबत अफवेचाच कयास लावला जात होता; परंतु हे वृत्त खरे असल्याचे समजल्यानंतर ठराविक राजकीय गोटात आनंदाची, तर नाशिककरांमध्ये संताप व्यक्त झाला. अभिषेक कृष्णा हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत.