पीक विमा योजनेची 31 अखेर मुदत
नाशिक/प्रतिनिधी। 09 - पंतप्रधान पीक विमाय योजना खरीप हंगामात लागू करण्यात आली असून या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2016 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, कारळा, कापूस आणि खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकर्यांवरील भार कमी करण्यासाठी खरीप हंगामात शेतकर्यांनी भरावयाचा विमा हप्ता केवळ दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्का आहे. नगदी पिकासाठी विमा हप्ता पाच टक्के आहे. कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. योजने अंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्र्ीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खड, कीड व रोग आदी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट केलेली आहे. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या नुकसानीसाठीदेखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख अन्नधान्य, गळितधान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप यांनी केले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत पिक विमा योनजा राज्यात 2016 मधील मृग बहाराकरिता लागू करण्यासाठी शासनाने 5 जलै रोजी मान्यता दिली आहे. अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कँपनी लि. मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
बिगर कर्जदार किँवा कर्जदार शेतकर्यांकरिता अधिसूचित फळपिकाचा विमाहप्ता भरण्याची अंतिम मुदत पेरू पिकासाठी 12 जुलै 2016 आणि डाळींबासाठी 14 जुलै 2016 आहे. सर्व फळ उत्पादक शेतकरी बंधूंनी विहित मुदतीत विमाहप्ता भरून योजनेचा अधिकाधीक लाभ घ्यावा. अधिसूचित फळपिकांकरिता कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या सर्व शेतकर्यांचा विमा विहित मुदतीत करून घेणे सर्व बँकाना अनिवार्य आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.