भारनियमन रद्द करण्यासाठी मनसेचे आंदोलन
। वीज वितरण कंपनीच्या अधिकार्याच्या आश्वासानंतर आंदोलन स्थगित । निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला
पाथर्डी (प्रतिनिधी) । 09 - रात्रीचे भारनियमन रद्द करुन सिगंल फेजचे काम त्वरीत पुर्ण करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने विजवितरण कंपनीच्या कार्यालयावर तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढून दोन तास ठिय्या आंदोलन केले.मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश पालवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शिरसाठवाडी येथील पडकाचा मळा, मुंजोबा नगर, भैरवनाथ वस्ती, शेकडेमळा या भागातील ग्रामस्थ शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध केला. यावेळी माहिती देताना पालवे म्हणाले वारंवार मागणी करुनही
अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत मागिल आठवड्यात आंदोलना संदर्भात पत्र दिले त्याची ही दखल घेतली नाही. तालुक्यात रात्रीचे भारनियमन अधिकृतपणे सध्या सुरु नाही. टंचाई योजनेचे टॅकर भरले जाण्यासाठी स्थानिक पातळीवर रात्रीचे भारनियमन केले जात होते. टॅकर बंद होऊन महिना होत आला. मात्र भारनियमन बंद करण्याऐवजी लोकांची अडचण वाढविण्यात धन्यता मानणार्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. ग्रामिण भागातल्या गरजा व मागण्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने लोकांची गैरसोये होते. यावेळी झालेल्या चर्चेत आंदोलकांपैकी प्रविण शिरदाट वासुदेव शिरसाट, बबन ढाकणे, स्वामी खाडे, विठ्ठल विघ्ने, सुधिर शिरसाट, नारायण शिरसाट, अमोल गिते, कृष्णा धायतडक, महादेव अव्हाड आदींनी चर्चेत भाग घेतला. वितरण कंपनीतर्फे विविध अधिकार्यांनी आंदोलकांच्या भावना समजावून घेत वरिष्ठ अधिकार्याबरोबर चर्चा घडवून आणली. येत्या आठवड्यात सिगंल फेजींचा सर्वे पुणे करुन पुढील कार्यवाही करु रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करीत असल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
