यू मुंबा विजयी; तर बुल्स पुन्हा पराभूत
बेंगलुरू, दि. 15 - स्टार स्पोटस् प्रो कबड्डी लीग मध्ये गुरूवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यू मंंबाने जयपूर पिंक पँथर्सचा 29 -23 असा पराभव करून अंक तालिकेत चौथ्यास्थानी झेप झेतली. जसवीर सिंगच्या चतूर खेळाला अनुप कुमार आणि राकेश कुमार या अनुभवी जोडीने सडेतोड उत्तर देत यू मुंबाला विजय मिळवून दिला. यू मुंबाकडून राकेश कुमार, सुरूसू कुमार, अनुप कुमार यांनी चढाईत चांगली कामगिरी केली तर पकडीमध्ये सुरजीत, जीवा यांनी गुण मिळविले.
पहिल्या सत्रात 9-10 असे पिछाडीवर असूनही यू मुंबाने विजयाला गवसणी घातली. राकेश कुमार आणि जसवीर यांच्यातील शाब्दिक चकमकीनेही प्रेक्षकांमधील तणाव वाढवला. मुंबाचा कर्णधार अनुप वारंवार राकेशला शांत राहण्याची सूचना देत होता, परंतु अखेरच्या काही मिनिटांत जसवीर व
राकेश यांच्यातील शाब्दिक चकमक टोकाला गेली. पंचांनी जसीवरला हिरवे कार्ड दाखवले, तर अनुपने राकेशला शांत केले.
दरम्यान बेगलुरू लेगच्या दुसर्या लढतीत पाटणा पायरेट्सने बंगळुरू बुल्सवर 38-23 अशा फरकाने विजय मिळवला. आपल्या घरच्या मैदानावर बुल्सचा हा सलग तीसरा पराभव होय. पटणा पायरेट्सकडून प्रदीप नरवाल अपयशी ठरला. त्यामुळे त्याला बदली करण्यात आले. पटणा पायरेट्सकडून राजेश मंडल, सुरजीत सिंग नरवाल, यांनी चढाईत तर इराणी खेळाडू फजल अत्राचली, कर्णधार धर्मराज चेरलाथन, यांनी पकडीत चमक दाखविली. बुल्सकडून पुन्हा मोहित-सुरेंदर नाडा ही कोपरा रक्षक जोडी अपयशी ठरली. रोहित कुमार याने चढाईत गुण मिळविले. रोहित कुमार चढाईत लीगमध्ये आघाडीवर आहे तर मोहित चिल्लर हा पकडीमध्ये आघाडीवर आहे.