विंडीजवर विजय मिळवू : अश्विन
बासेटेरे, दि. 15 - भारत आणि विंडीजमध्ये होणार्या 4 कसोटी मालिकेला आता 21 जुलैपासून सुरूवात होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आम्ही वर्चस्व गाजवू, असा आशावाद अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केला आहे. अश्विन म्हणाला,‘पहिल्या सराव सामन्यादरम्यान विंडीजच्या फलंदाजीचा मला वेध आला आहे. विंडीजमधील विकेट मंद असतील पण गोलंदाजांना बळी घेणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी संयमाने मारा करावा लागणार आहे.’ मागच्या सामन्यात अमित मिश्राने 15-16 षटके गोलंदाजी केल्यानंतरच त्याला बळी घेणे शक्य झाले, याकडे अश्विनने लक्ष वेधले.
