खड्डे दुरुस्ती 27 जुलैपर्यंत करण्याचे आदेश ः महापौर
पुणे, दि. 15 - पुणे शहरात पावसामुळे विविध भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याची दखल घेत शहरातील वर्दळीच्या स्वारगेट चौकातील खड्डे दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर 27 जुलैपर्यंत संपूर्ण शहरातील खड्डयाची दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सप्टेंबर अखेरपर्यंत रस्ते खोदाई होता कामा नये, असे आदेश देखील देण्यात आले आहेत.
यावेळी महापौर जगताप म्हणाले की, शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून शहरातील 45 मुख्य रस्त्याची देखील पाहणी करण्यात आली आहे. तसेच त्यात प्रामुख्याने बिबवेवाडी आणि शिवाजी रस्त्यावरील गरवारे बालभवन समोरील रस्ता या दोन्हीचे काम यंदाच्या वर्षी करण्यात आले होते. मात्र त्याच रस्त्याची अवस्था वाईट असल्याची बाब समोर आली असून याचे काम करणार्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना काळया यादीत टाकले जाणार आहे.
या सर्व कामाचा अहवाल येत्या दहा दिवसात प्रशासनाला प्राप्त होणार आहे. या रस्त्याची डागडुजी देखील त्यांच्याकडून केली जाणार आहे. शहरातील नागरिकांना या पुढील काळात कोठे ही खड्डे दिसल्यास 9689900002 या नंबर वर फोटो पाठविण्याचे अवाहन त्यांनी केले.