सुर्यवंशीवर फौजदारी गुन्हा दाखल करा!
शिवक्रांती युवा सेनेचे विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने
औरंगाबाद, दि. 05 - सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवावा, व अधिक्षक अभियंता ए. बी. सुर्यवंशी कार्यकारी अभियंता वृशाली गाढेकर, कार्यकारी अभियंता शेंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून यांची ए.सी.बी. मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी मगंळवारी शिवक्रांती युवा सेनेच्या वतीने येथील विभागीय कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.अधिकाराचा गैर वापर करून शासकीय निधी
चा संगनमत व कटकारस्थान करून संस्था व ठेकेदार यांच्याशी हातमिळवणी करून तब्बल 140 कोटी रूपयाच्या कामाची नोंद करून शासकीय देयके मंजुर करून अदा करण्यात आली. प्लॅन व नॉन प्लॅन यांची 2014-15 /2015-16 या कालावधीतील अनेक कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच 2012-13 मधील रोजगार हमी योजनेच्या विहीरी खोदण्यात आल्या. मात्र मजुरांना अद्याप याचा मोबदला देण्यात आला नाही तोही मोबदला लवकरात-लवकर द्यावा अशी मागणी आंदोलन कर्त्याने केली.
यावेळी विभागीय उपायुक्त विजयकुमार फड यांनी संबंधीत अधिकार्यांवर लवकरात-लवकर कार्यवाही करण्यासठी तात्काळ निर्णय घेतले जातील असे सांगितले. या आंदोलनात शिवक्रांती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष सजय सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बोडखे, प्रदेश कार्याध्यक्ष परमेश्वर नलावडे, प्रदेश संघटक सचिन हावळे, प्रदेश कोषाध्यक्ष संतोष संत्रे, कामगार व कर्मचारी सेनेचे प्रदेश संघटक रविंद्र काळे, मराठवाडा उपाध्यक्ष संजय ताठे, मराठवाडा सरचिटणीस नंदकिशोर दहीहंडे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सोमनाथ मगर, जिल्हासंघटक नितीन कदम, वैजापूर तालुका अध्यक्ष दादासाहेब घायवट, विजय बेंबडे, जगन हुसे, रामेश्वर नलावडे, रमेश जोशी, वामनराव शेवाळे, अंकुश मिसाळ, सुनिल गायके, जगन हुसे, राजेंद्र गरड, फकिरआबा पवार आदी उपस्थित होेते.
