‘इसिस’कडून रमजानमध्ये 800 जणांची हत्या
नवी दिल्ली, दि. 05 - अमेरिका, फिलीपिन्स, येमेन, जॉर्डन, इराक, लेबनॉन, बांगलादेश, तुर्की व सौदी अरेबियात हल्ले ‘इसिस‘ या दहशतवादी संघटनेने रमजान महिन्यात जगभरात 800 नागरिकांची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. इराक व सिरीयामध्ये 400 जणांची इसिसने हत्या केली आहे. रमजान महिन्यात नागरिकांची हत्या करण्याची परवानगी आम्हाला देवाने दिली आहे. नागरिकांची हत्या केल्यामुळे आम्हाला जगभरातून पाठिंबा मिळत असून आमच्या चाहत्यांच्या संख्येत भर पडत आहे, असे इसिसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अरब प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘इराकमधील मोसूल शहरामध्ये रमजानच्या पहिल्याच दिवशी इसिसने 65 जणांची हत्या केली. बगदादमध्ये 3 जुलै रोजी केलेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 200 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.‘ दरम्यान, रमजान संपायला काही तास बाकी आहेत. या काळात इसिस जगभरात काही हल्ले घडवून आणते की काय याकडे लक्ष लागले आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
