कोकणी विद्यार्थ्यांनी मोठी महत्त्वाकांक्षा बाळगावी
कणकवली, दि. 12 - सिंधुदुर्गात 98 ते 100 टक्के गुण मिळवणे सोपे नाही. संपूर्ण कोकणवासीयांना तुमचा अभिमान वाटावा असेच हे यश आहे. आपल्या बुद्धीचा, हुशारीचा मला अभिमान वाटतो. मात्र, जीवनात यशस्वी होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांनी मोठी महत्त्वाकांक्षा बाळगावी, असे आवाहन कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार नारायण राणे यांनी रविवारी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेस आणि तातू राणे स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी, बारावीचे गुणवंत विद्यार्थी आणि 100 टक्के निकाल लावणा-या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सौ. निलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅँक अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर उपस्थित होते.
ते म्हणाले की, कोकणातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान आत्मसात करताना शिक्षण व संस्काराची सांगड घालावी. जीवनात उद्योजक किंवा बडया पगाराची नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवा. आई-वडील, शिक्षक व ज्येष्ठांबद्दल आदर ठेवा. स्नेहभाव वाढवा, यश मिळवणे सोपे आहे. मात्र, यशाचे सातत्य टिकवणेही महत्त्वाचे आहे, असे आवाहनही राणे यांनी केले.