Breaking News

शारापोव्हा ऑलिम्पिकमधून बाहेरच

लुसाने, दि. 12 - उत्तेजक सेवनाबद्दल घातलेल्या बंदीविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीला आणखी दोन महिने लागणार असल्यामुळे रशियाची अव्वल दर्जाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ही आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून वंचितच राहणार आहे.
बंदीच्या निर्णयाविरुद्ध शारापोव्हाने क्रीडा लवादापुढे अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीच्या वेळी आपण उत्तेजक घेतले असल्याची कबुली शारापोव्हाने दिली होती.