पत्रकार संघाच्या शिबीरात 122 रुग्णांना लाभ
पारनेर (प्रतिनिधी) । 09 - तळागाळातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वरोग निदान शिबिरे उपयुक्त आहेत. प्रयास महिला ग्रूपने अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी यांनी केले.
नगर येथील आनंदऋषी हॉस्पिटल, तालुका डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या विद्यमाने प्रयास महिला ग्रूपच्या पुढाकाराने आयोजित सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. प्रयास महिला ग्रूपच्या आशा औटी, ज्योत्स्ना शेटिया, उमा बोरुडे, चित्रा शेटिया, कल्पना शिंदे, वैजयंता बोरुडे, पुष्पा कावरे, कल्पना शिंदे, मंदाकिनी घोडके, डॉ. बबन सोबले, डॉ. किशोरकुमार पुरकर, डॉ. श्रीकांत पठारे, अनिल भंडारी, शिरीष शेटिया, डॉ. अखिल धानोरकर, डॉ. अमित पाटील, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. संदीप राणे या वेळी उपस्थित होते. या वेळी 122 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
सभापती औटी पुढे म्हणाल्या, धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियमित आरोग्य तपासणी करणो अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरांमधून गरजू रुग्णांना आरोग्य तपासणी करून उपचार घेणो फायद्याचे ठरते. हृदयरोग, मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. रुग्णांनी त्यावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्लयाने पथ्य पाळणे गरजेचे आहे.