डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ गंगाखेडात आंदोलन
परभणी/प्रतिनिधी, दि. 17 - दादर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडून स्वतःचा मास्टरप्लान करु पाहण्यार्या रत्नाकर गायकवाडांसह दोषींना त्वरीत अटक करा अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरी जनता सरकारसह आरोपींची रस्त्यावरुन धिंड काढल्या शिवाय राहणार नाही असा सनसनीत इशारा भारिपचे जिल्हाध्यक्ष यशवंतभैय्या भालेराव यांनी गंगाखेड येथे संपन्न झालेल्या निषेध आंदोलन दिला आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या नावावर पोटाची खळगी भरणार्यांनी बाबासाहेबांशी बेइमानी करण्याचे पातक कृत्य समाजविरोध असुन त्यांना शिक्षका झालीच पाहिजे. जातीयवादी सरकारच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्या मनातील इच्छापुर्तींसाठी रत्नाकर गायकवाड आणि दोषी सहकार्यांना डॉ. बाबासाहेबांची ऐतिहासीक वास्तु म्हणुन जगात प्रसिध्द असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाला पाडून देशातील आंबेडकरी जनतेच्या भावनांना छेद दिला आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत दोषी आरोपींना तुरुंगात डांबावे अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता रस्त्यावर उतरुन दोषींच्या धिंड्या काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने त्वरीत निर्णय घेवून समाजाची मागणी पुर्ण करावी अन्यथा सत्तेवरुन पायउतार व्हावे असा इशारा आंदोलनात सहभागी नेतृत्वकारी नेत्यांनी आपल्या आंदोलनपर मनोगतातुन व्यक्त केला. या आंदोलनात हजारोच्या संख्येने नागरीकांनी सहभाग नोंदवुन युती सरकारसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात सिंहाचा वाटा असणार्या रत्नाकर गायकवाड च्या विरोधात घोषणाबाजी करत गंगाखेड शहर दणानुन सोडले. भारतीय बौध्द महासभा गंगाखेडच्या वतीने दिनांक 16 जुलै रोजी तहसलि कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलेल्या या मोर्चात सुरेशभाऊ साळवे, विजय साळवे, धम्मानंद गायकवाड, राहुल भुमरे, गौतम सावंत, हारि साळवे, यशवंत भैया भालेराव, गौतम रोहिणकर,पी.धम्मानंद, व्ही.व्ही. वाघमारे, सत्यपाल साळवे, बाळा साळवे, विशाल साळवे, व भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा, शहर शाखा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाली होती.