यशवंत सिन्हा यांचा सरकारला घरचा आहेर
नवी दिल्ली, दि. 12 - भारताने दाखवलेला विकासदर हा फुगवून सांगितलेला आहे,या अमेरिकेच्या टीकेवर सरकारने स्पष्टीकरण केले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. भारताच्या विकासदराच्या मोजणीतील विसंगती दूर केल्या तर हा दर झपाटयाने खाली आलेला असेल,असे सिन्हा म्हणाले. 2015-16 वर्षातील गृहीत धरलेली 1,40,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम विसंगत असून तिच्यामुळेच विकासदर फुगवलेला वाटतो.
हा आकडा गेल्या वर्षी 30,000 कोटी इतकाच होता. या विसंगती दूर केल्या तर झपाटयाने विकासदर खाली येईल. सरकारवर नेहमीच टीका करणा-या सिन्हा यांनी आणखी एकदा सरकारला धारेवर धरले आहे.
हा आकडा गेल्या वर्षी 30,000 कोटी इतकाच होता. या विसंगती दूर केल्या तर झपाटयाने विकासदर खाली येईल. सरकारवर नेहमीच टीका करणा-या सिन्हा यांनी आणखी एकदा सरकारला धारेवर धरले आहे.