Breaking News

मोहमद शमीला बीसीसीआयकडून दोन कोटी

नवी दिल्ली, दि. 11-  दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकलेला भारताचा वेगवान गोलंदाज याला बीसीसीआयकडून दोन कोटी 23 लाख 12 हजार 500 रूपये नुकसान भरपाई म्हणून बीसीसीआयने दिले आहेत. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे झालेल्या वन डे क्रिकेट विश्‍वचषकानंतर गुडघ्याच्या जखमेमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रास  गुडघ्याच्या जखमेमुळे शमी आयपीएल-8मध्ये खेळू शकला नव्हता. त्याआधी दुखणे असताना देखील त्याने वन डे विश्‍वचषकात भाग घेतला होता. आयपीएलमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्याला ही रक्कम देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने वेबसाईटवर म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने विश्‍व चषकात टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने पाच सामन्यात 17 गडी बाद करीत पाचवा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मान पटकविला. शमीने गुडघ्यावर श्स्त्रक्रिया करून घेतली. भारताने यंदा सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा देखील शमीच्या पायाचे स्रायू ताणले गेले होते.