जिल्ह्यात दोन शेतकर्यांची आत्महत्या
परभणी/प्रतिनिधीः 11 - वाडी दमई येथील एका शेतकर्यांने कर्जास कंटाळून स्वतःची जिवन यात्रा संपवील तर पुर्णा तालुक्यातील वझुर येथील एका शेतकर्याने पैशांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
परभणी तालुक्यातील वाडी दमई येथे एका अल्पभुधारक शेतकर्याने पिककर्जाचे पुनर्गठन न झाल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या करुन जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. तालुक्यातील वाडी दमई येथे राहणारे अल्पभुधारक शेतकरी कैलास तरवटे आपल्या शेतीच्या तुकड्यातुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सततच्या नापिकीमुळे व निसर्गाच्या प्रकोपामुळे कर्जबाजारी झालेल्या कैलास तरवटे यांनी गतवर्षी आपल्या शेतातील. पिक विमा काडुन दुष्काळात कठीण समई कुटुंबाचा आर्थिक बोजा पेलण्यासाठी पिककर्ज पुनर्गठनासाठी प्रशासकीय कार्यालयाचे खेटे खात बँकेचे उबंरठे झिजवले होते. परंतु शासन दरबारी आपले गार्हाणे कोणीही ऐकुण घेण्यास तयार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या कैलास तरवटे याने गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत असुन या प्रकरणी रात्रीउशीरा प्रयत्न गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. प्रशासनाच्या दंडूकेशाहीला व रटाळ कामगाजास त्रासून गेल्यामुळे कैलास तरवटे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या निकटवृत्तीयानी बोलून दाखविले. दुसर्या एका घटनेत वझुर येथील सतिश पवार नामक शेतकर्यांने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. कर्जबाजारीपणा मुळे शेतकर्यांवर आलेल्या आत्महत्या प्रसंगाची घटना दुःख असल्याच्या भावना जिल्हाधिकारी महिवाल यांनी कुटुंबीयांची भेट घेवून व्यक्त केली.