Breaking News

कर्जाला कंटाळून आत्महत्या

सेलू/प्रतिनिधी, दि. 11 - जिंतूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवगाव फाटा शिवारात एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्यामुळे  परिसरात खळबळ उडाली आहे. 
या बाबत अधिक वृत्त असे की, सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील शेख कईमोद्दिन शेख सिकंदर या इसमाने दोन महिन्यांपुर्वी अपघात झाल्यामुळे पायाच्या  उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सततच्या नापीकीमुळे व  घरातील क्लेषदायक वातावरणा मुळे चिंताग्रस्त होवून वैफल्यग्रस्त झालेल्या देवगाव फाटा येथील चक्रधर आश्रोबा खिस्ते यांच्या शेतातील धुर्‍या जवळ असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपविली. या प्रकरणी पोलीस पाटील आश्रोबा पांडूरंग खिस्ते, यांच्या माहितीवरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. सदरील  इसमाने  खाजगी  सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी सावकाराकडून सततचा होणारा  तगादा व घरात लग्नास आलेल्या मुलीच्या भविष्याची चिंता डोक्यात घेवून वैफल्यग्रस्त झालेल्या कैमोद्दिन याने देवगाव फाटा शिवारात आत्महत्या केली. या घटनेचा  अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर घोडवे. व पो.का. देवकर, गणेश, चेके, सतिश टाके, आदी करत आहेत.